Friday, 26 September 2014

श्रीराम विद्यालयामध्ये कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

श्रीराम विद्यालयामध्ये कर्मवीर जयंती उत्साहात साजरी
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १२७ जयंती श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने कर्मवीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन स्कूल कमिटी सदस्य श्री. टी.के. बांगर आणि मा.मुख्याध्यापक सुर्यकांत मेंगडे व पर्यवेक्षक श्री. आबाजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती श्री. निलेश बाणखेले यांनी दिली.
      
बहुजनांसाठी कर्मवीरांनी शिक्षणाची द्वारे खुली केली – प्राचार्य गायकवाड
        रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १२७ जयंतीच्या निमित्ताने पिंपळगाव खडकी येथील श्रीराम विद्यालयामध्ये सभेचा कार्यक्रम आयोजित केला गेला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी श्री. बाबुरावदादा बांगर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून कर्मवीरांनी शाहू,फुले,आंबेडकरांचे विचार जोपासत ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यातील बहुजन समाजापर्यंत पोहचविण्याचे भगीरथ कार्य केले असे प्रतिपादन केले. याप्रसंगी विद्यालयातील शैक्षणिक, क्रीडा,सांस्कृतिक क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुर्यकांत मेंगडे यांनी केले. कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद सदस्य श्री. मथाजी पोखरकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण व प्रभाकर बांगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास मा.टी.के.बांगर, शिवाजी पोखरकर, श्री.रोहिदास पोखरकर, श्री. रामचंद्र पोखरकर, ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर  तसेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बारवे पी.सी. व श्री. बांगर बी.एस. तसेच आभार श्री. वाडेकर ए.पी. यांनी मानले.








No comments:

Post a Comment