मुख्य पान


श्रीराम विद्यालय, पिंपळगाव (खडकी) माध्यमिक शाळा माहिती

शाळेचे नाव :रयत शिक्षण संस्थेचे,श्रीराम विद्यालय पिंपळगाव (खडकी)
शाळेची स्थापना :२८-२-१९६७
शाळेचे वर्णन :तीन इमारती, १२ वर्गखोल्या, १ विज्ञान प्रयोगशाळा, २ अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा, २ शिक्षक स्टाफरूम, १ ग्रंथालय, १ मुख्याध्यापक कक्ष, १ लेखनिक कार्यालय, १ शारीरिक शिक्षण साहित्य खोली, ४ डेड स्टॉक, ४ भव्य मैदाने, १ पाण्याची टाकी,१ विहीर,कार्यालयाच्या मुख्य इमारती समोर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्मारक, त्या स्मारकाभोवतीने सुंदर असा बगीचा
शाळेतील सरासरी शिक्षक संख्या :१७ शिक्षक, ३ शिपाई, २ क्लार्क, १ नाईक, १ मुख्याध्यापक, १ पर्यवेक्षक, १ ग्रंथपाल, १ प्रयोगशाळा सहाय्यक
शाळेतील सरासरी विद्यार्थी संख्या :४९८ = २४४ मुले + २५४ मुली
शाळेमार्फत देण्यात येणारी सुविधा :
१.विद्यार्थ्यांना त्या त्या विषय शिक्षकाच्या मार्फत सर्व विषयाचे अध्यापन
२.रयत प्रज्ञाशोध, माध्यमिक शिष्यवृत्ती, एन.एम.एस., एन.टी.एस.शिष्यवृत्ती परिक्षेची तयारी
३.परिसर भेटीसाठी सहलीचे आयोजन
४.पिण्यासाठी स्वच्छ पाणी
५.संगणक कक्ष संगणकाचे शिक्षण देण्यासाठी २ संगणक प्रशिक्षक
६.शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत दर्जेदार आहार
७.इ-लर्निंग सॉफ्टवेअर सुविधेद्वारे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण
८.पालक मेळावा आयोजन पालकांचे प्रबोधन
९.तज्ञ व नामांकित मान्यवरांचे मार्गदर्शन
१०.शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार
शाळेला मिळालेले पुरस्कार :
१..मा.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र, पुणे चा पुरस्कार

1 comment:

  1. hi all of u best wishesh to karmaveer jayanti
    Ghodake sir
    9850079717

    ReplyDelete