Friday, 24 January 2014

असे झाले पथक पर्यवेक्षण...

२२ जानेवारी २०१४ 

आज पथक पर्यवेक्षनाच्या शेवटी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. शिवाजीदादा बेंडे पाटील उपस्थित होते. त्यांनी रयत सेवकांशी हितगुज साधला. चित्रामधून आपणास बोध होईलच धन्यवाद..!!!

Wednesday, 22 January 2014

विशेष पथक पर्यवेक्षण सन -२०१३-१४

आज विद्यालयामध्ये पथक पर्यवेक्षण आहे. या साठी खालील मान्यवर उपस्थित होते.
चेअरमन : मा.प्रा. एस.डी.शिंदे.(अ.आ.महाविद्यालय,मंचर )
सदस्य -
१)श्री. निंगळ पी.एम. मुख्याध्यापक, बेळेश्वर विद्यालय, बेल्हे.
२) श्री. मोनपगोल डी.आर. (सेवानिवृत्त मुख्याध्यापक )
विषयतज्ञ मंचर:-
३) सौ. बाणखेले एम.बी.
४) सौ.उपार एस.एल.
५) श्री. मुजावर एस.ए.
६) श्रीम. चिखले ए.एस.
श्री. थोरात डी.एस. (कनिष्ट लिपिक महात्मा गांधी मंचर)
 
 
 

Tuesday, 14 January 2014

रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.

रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.
वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||

कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे.
शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते  आहे.
धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे.
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||

गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई.
कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई.
स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे.
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||

दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया
अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया.
शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे.
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||

जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी,
इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी
प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे.
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||४||

Saturday, 11 January 2014

कडाक्याच्या थंडीतही आंबेगाव तालुका सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा संपन्न




दि. ११ जाने. २०१४ (श्रीराम विद्यालय, पिंपळगाव ख.)
        श्रीराम विद्यालय, पिंपळगाव (खडकी)  येथे  आंबेगाव तालुका माध्यमिक व उच्चमाध्यमिक मुख्याध्यापक संघ आयोजित तालुका सामान्यज्ञान परीक्षा कडाक्याच्या थंडीमध्ये सकाळी घेण्यात आली. लहान व मोठ्या गटात एकूण ४९० मुलांनी सहभाग घेतला. सदर परीक्षेचे कामकाज पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व सेवकांचे सहकार्य लाभले. घेण्यात आलेली परीक्षा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणात्मक दर्जा वाढण्यासाठी उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.सुर्यकांत मेंगडे व पर्यवेक्षक आबासाहेब गायकवाड यांनी दिली.`