रयते
मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.
वटवृक्षाच्या
विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||
कर्मवीरांचे
ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे.
शाहू-फुल्यांचे
समानतेचे तत्व मानसी मुरते आहे.
धर्म
जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे.
रयते
मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||
गरिबांसाठी
लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई.
कमवा
आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई.
स्वावलंबी
वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे.
रयते
मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||
दिन-दलितांसाठी
आण्णा तुमची झिजली चंदन काया
अनाथ जीवा
सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया.
शून्या
मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे.
रयते
मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||
जीवनातला
तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी,
इथे
लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी
प्रतिभाशाली
बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे.
रयते मधुनी नव्या युगाचा
माणूस आता घडतो आहे. ||४||

No comments:
Post a Comment