दि. ११ जाने.
२०१४ (श्रीराम विद्यालय, पिंपळगाव ख.)
श्रीराम विद्यालय, पिंपळगाव (खडकी) येथे आंबेगाव तालुका माध्यमिक व उच्चमाध्यमिक
मुख्याध्यापक संघ आयोजित तालुका सामान्यज्ञान परीक्षा कडाक्याच्या थंडीमध्ये सकाळी
घेण्यात आली. लहान व मोठ्या गटात एकूण ४९० मुलांनी सहभाग घेतला. सदर परीक्षेचे
कामकाज पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व सेवकांचे सहकार्य लाभले. घेण्यात आलेली
परीक्षा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणात्मक दर्जा वाढण्यासाठी उपयुक्त असल्याची
प्रतिक्रिया विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री.सुर्यकांत मेंगडे व पर्यवेक्षक
आबासाहेब गायकवाड यांनी दिली.`




No comments:
Post a Comment